पेंट कंपनीला आग

By Admin | Updated: October 15, 2015 02:06 IST2015-10-15T02:06:47+5:302015-10-15T02:06:47+5:30

रबाळे एमआयडीसी येथील रंग कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे मात्र आर्थिक नुकसान झाले आहे

Paint company fire | पेंट कंपनीला आग

पेंट कंपनीला आग

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथील रंग कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे मात्र आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने रात्री उशिरा आग आटोक्यात आली.
इम्पेरियल पेंट केमिकल कंपनी असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीत आग लागली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा होता. केमिकलचे हे ड्रम पेटल्याने आग सर्वत्र पसरली होती. त्यामुळे कंपनीतील कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच ऐरोली, पावणे एमआयडीसी, वाशी, नेरूळ या ठिकाणचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नानंतर रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. कंपनीला लागलेली आग पसरून लगतच्या इतर कंपन्यांना देखील आगीचा धोका होता. मात्र अग्निशमन दलाच्या सलग दोन तासांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली. यामुळे त्याठिकाणची संभाव्य मोठी दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)

Web Title: Paint company fire