मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत. ...
पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित दहा गावांना स्थलांतरासाठी देण्यात आलेली मुदत ७ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. या मुदतीपर्यंत केवळ १३00 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. ...
खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. ...
गतमहिन्यात नोटीस बजावून देखील सुरू असलेल्या विनापरवाना शाळांवर अद्यापही कसलीच ठोस कारवाई झालेली नाही. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरातील विनापरवाना शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ...
मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले. ...
कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...