...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:23 IST2025-07-27T12:22:43+5:302025-07-27T12:23:22+5:30

उलवेतील बेकायदा कत्तलींबाबत तक्रार

only then will navi mumbai airport get a license | ...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर

...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १० किमी परिसरात येणाऱ्या उलवेतील बेकायदेशीर कत्तलीबाबत  नॅटकनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. याची नागरी विमान वाहतूक संचालकांनी दखल घेतली असून, धावपट्टीजवळील बेकायदेशीर कत्तलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. विमानतळास परवाना देण्यापूर्वी येथील कत्तलखान्यांची पूणर्तपासणी करण्याचे आश्वासन संचालकांनी दिले आहे. 

रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळाजवळ विमानाच्या टेक ऑफ आणि लॅंडिंगदरम्यान पक्ष्यांचा धोका असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नॅटकनेक्ट फाउंडेशचे संचालक बी. एन. कुमार यांनी डीजीसीएला पुन्हा स्मरणपत्र पाठवले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाससुद्धा पक्ष्यांचा धोका असून, परिसरात सुरू असलेल्या प्राण्यांच्या बेकायदेशीर कत्तलीमुळे तो वाढल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी कुमार यांच्या तक्रारीची पूणर्तपासणी करूनच विमानतळास परवाना देण्यात येणार असल्याचे उत्तर दिले आहे. 
उलवे नोडचे व्यवस्थापन सिडको करत असून, तेथे बेकायदेशीर कत्तल आणि विक्री वाढत असताना अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप कुमार यांनी आरोप केला आहे. 

गंभीर प्रश्न गायब

विमानतळाच्या परिघात बेकायदेशीर कत्तलीशी संबंधित मुद्दा नोटम यादीतूनसुद्धा गायब असून ज्यामध्ये लँडिंग आणि टेक-ऑफ मार्गांचा अभाव आणि ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर, १२ मोबाइल टॉवर आणि आठ फ्लडलाइट पोलसह २२५ अडथळ्यांचा उल्लेख आहे. मात्र, कत्तलीचा प्रश्न गायब असल्याने बी. एन. कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘या’ कारणामुळे टेकऑफ, लॅंडिंगच्या वेळी धोका

पीएमओच्या सार्वजनिक तक्रार संकेतस्थळावर प्राण्यांच्या कत्तलीचा कचरा, विक्री आणि ढीग यामुळे मोठे पक्षी आकर्षित होऊन ते उड्डाण विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफवेळी टक्कर देऊ शकतात, असे आपल्या पत्रात म्हटले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती वन्यजीवांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एअरोड्रोम ऑपरेटरकडून कारवाई सुरू असल्याचे सांगून डीजीसीए संचालक गुप्ता यांनी हे प्रकरण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सुद्धा पाठविल्याचे कुमार यांनी सांगितले.
 

Web Title: only then will navi mumbai airport get a license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.