कांद्याचे भाव ६० रुपयांवर
By Admin | Updated: August 30, 2015 21:27 IST2015-08-30T21:27:23+5:302015-08-30T21:27:23+5:30
कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. चार दिवसापूर्वी १०० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता बाजारात ६० रुपये दराने उपलब्ध झाला आहे

कांद्याचे भाव ६० रुपयांवर
वसई : कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. चार दिवसापूर्वी १०० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता बाजारात ६० रुपये दराने उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. कांद्यासमवेत टॉमेटोचेही भाव खाली आले आहेत. ५० रुपये किलो दराने विकण्यात येणारा टॉमेटो आता २० रुपये वर आला आहे.
एकेकाळी वसईतील भाजीपाल्याने मुंबईच्या बाजारावर अधिराज्य गाजवले होते त्या वसईकरांना आता अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. वसईतील भुईगाव परिसरात होणाऱ्या पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र कमी झाल्यामुळे वसईकरांना आता नाशिकहून येणाऱ्या कांद्यावर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही वर्षात या कांद्याचे भाव सतत चढे राहील्यामुळे कांदा सर्वसामान्यजनांसाठी डोळ्यात पाणी आणणारा ठरला आहे. ४ दिवसापूर्वी कांद्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले होते. (प्रतिनिधी)