शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची घसरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:20 IST

मुंबईमध्ये तुर्कीवरूनही कांद्याची आवक

- नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे दर नियंत्रणामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई व सोलापूर वगळता इतर बाजारपेठेमध्ये कमाल दर १०० पेक्षा कमी झाले आहेत. मुंबईमध्ये गुजरात, मध्यप्रदेशसह इजिप्त व तुर्कीवरूनही कांदा विक्रीसाठी येऊ लागला असून, बुधवारी प्रतिकिलो ४० ते १०० रुपये दराने कांद्याची विक्री झाली.

राज्यभर सर्वत्र गत आठवड्यामध्ये कांद्याचे दर १३० रुपये किलोवर गेले होते. सोलापूरमध्ये एक दिवस प्रतिकिलोला २०० रुपये विक्रमी भावही मिळाला होता; परंतु नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे दरांची घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी ६६० टन आवक झाली आहे. आवक कमी होऊनही दर स्थिर राहिले आहेत. एक महिन्यापासून इजिप्तवरूनही नियमितपणे कांदा विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तुर्कीवरील कांदाही मार्केटमध्ये आला असून, तो ६५ ते ७५ रुपये किलो दराने विकला जात होता.

मुंबईत दर चांगले भेटत असल्यामुळे गुजरात व मध्यप्रदेशमधूनही येथे कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. मुंबईप्रमाणे राज्यभर कांद्याची घसरण सुरू आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये प्रतिकिलो २ ते १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. दोन बाजार समिती वगळता इतर कुठेही १०० रुपये दर मिळू शकला नाही. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये बुधवारी ११ हजार ११३ टन कांद्याची आवक झाली.

सोलापूर बाजारसमितीमध्ये सर्वाधिक ३,५०८ टन आवक झाली आहे. आवक नियमितपणे सुरू झाली तर दर स्थिर राहतील, अन्यथा पुन्हा कांद्याचे दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये या आठवड्यामध्ये दर नियंत्रणामध्ये आले आहेत. प्रतिकिलो ४० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. पुणे व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, परराज्यातील मालही विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तुर्कीचा मालही विक्रीसाठी आला आहे.- सुरेश शिंदे, कांदा व्यापारी, मुंबई

टॅग्स :onionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी