तलोजा जेल शेजारील तलावात एक जण बुडाला
By नारायण जाधव | Updated: July 8, 2023 19:22 IST2023-07-08T19:22:01+5:302023-07-08T19:22:19+5:30
मागील आठवड्यात कोळवाडी येथे एक मुलगा बुडल्याची घटना ताजी असतानाच तलोजा जेल शेजारील तलावामध्ये एक तरुण बुडल्याची घटना 8 जुलै रोजी घडली आहे.

तलोजा जेल शेजारील तलावात एक जण बुडाला
नवीन पनवेल : मागील आठवड्यात कोळवाडी येथे एक मुलगा बुडल्याची घटना ताजी असतानाच तलोजा जेल शेजारील तलावामध्ये एक तरुण बुडल्याची घटना 8 जुलै रोजी घडली आहे.
तलोजा जेल शेजारील तलाव मध्ये पावसाळ्यात नेहमीच पर्यटक आनंद घेण्यासाठी येत असतात. तसेच प्रत्येक वर्षी काही ना काही तरी दुर्घटना या ठिकाणी घडत असते. आजही दोघे जण या तलावात मौजमजा करण्यासाठी गेले होते.
यातील एक तरुण त्या पाण्यामध्ये बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ,फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होऊन त्याची शोधा शोध सुरू केली आहे.