दिवेआगरात एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:21 IST2018-11-16T04:21:32+5:302018-11-16T04:21:45+5:30
साधारण ५० वर्षीय व्यक्तीची डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दिवेआगरात एकाची हत्या
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर किनाऱ्यालगत १० दिवसांपूर्वी हत्या झाली होती. हत्येमध्ये ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह झाडीमध्ये टाकण्यात आल्याची माहिती दिवेआगर येथील प्रत्यक्षदर्शी हमीद सादुल्ला याने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांना दिली. त्यानुसार घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
साधारण ५० वर्षीय व्यक्तीची डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, हत्येच्या कटात सहभागी असणाºया संशयित दिवेआगर येथील एक खरसई म्हसळा येथील एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून हत्येमध्ये वापरण्यात आलेला रक्त लागलेला फावडा व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.