कोलाड अपघातात एक ठार

By Admin | Updated: April 21, 2016 02:47 IST2016-04-21T02:38:57+5:302016-04-21T02:47:02+5:30

सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या कोलाड हायस्कूलच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे कोलाड विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

One killed in Collada accident | कोलाड अपघातात एक ठार

कोलाड अपघातात एक ठार

रोहा : सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या कोलाड हायस्कूलच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे कोलाड विभागात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात केली आहे.
रविवारी (१७ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोलाड हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र भोसले (४७) व त्यांची पत्नी आशा भोसले (४०) हे दाम्पत्य रात्री शतपावली करीत कोलाड-रोहा रोडने संभेकडे जात असताना पाठीमागून सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामुळे शिक्षक राजेंद्र भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना पनवेलच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेले ४८ तास ते मृत्यूशी झुंज देत असताना बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दुचाकीस्वार हा इंदापूर (ता. माणगाव) येथील प्रणय बाळाराम पवार असल्याची माहिती मिळाली.
>शेतपळस गावाजवळ अपघात; दोघे किरकोळ जखमी
नागोठणे : भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारला धडक मारून अज्ञात वाहन पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर शेतपळस गावाचे हद्दीत घडली आहे. एमएच ०८ एफ ३८६ क्रमांकाची अपघातग्रस्त स्विफ्ट कार रत्नागिरीच्या कामगार आयुक्त कार्यालयाची होती, असे पोलिसांनी सांगितले.गाडी मुंबईहून रत्नागिरीकडे परतत असताना महामार्गावर अपघात झाला. अपघातात सैल सिदप्प मुदफनावर आणि अनिल गुरव ( चालक ) हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील पुढील तपास करीत आहेत. अशा प्रकारे अपघात होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

Web Title: One killed in Collada accident