शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणामुळे वृद्धाची आत्महत्या

By admin | Updated: January 28, 2017 03:06 IST

आवडता स्वयंपाक न केल्यामुळे पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीच्या (ट्रॉम्बे) माजी कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना

नवी मुंबई : आवडता स्वयंपाक न केल्यामुळे पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीच्या (ट्रॉम्बे) माजी कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री कोपरी येथे हा प्रकार घडला असून त्याठिकाणी ते सहकुटुंब राहायला होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.प्रताप दामोदर ठाकूर (७९) असे त्यांचे नाव आहे. बीएआरसीत ते क्लार्क म्हणून कामाला होते. १९९६ साली सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पत्नी व मुलांसह कोपरीत राहत होते. बुधवारी रात्री आवडती भाजी न बनवल्याने त्यांचे पत्नीसोबत वाद झाला. रस्सा भाजी हवी असतानाही साधी भाजी बनवल्याने प्रताप यांचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर ते त्याच इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये निघून गेले. सदर फ्लॅट त्यांच्या मुलीचा असून ती नोकरीनिमित्ताने विदेशात असल्यामुळे त्याची चावी ठाकूर यांच्याकडेच असायची. अनेकदा एकांत हवा असल्यास प्रताप ठाकूर हे मुलीच्या फ्लॅटमध्ये जावून बसायचे. बुधवारी रात्री देखील भांडणानंतर ते मुलीच्या फ्लॅटमध्ये विश्रांतीसाठी गेले होते. परंतु काही वेळातच सदर फ्लॅटमधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे ठाकूर यांच्या कुटुंबीयांसह इतर रहिवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी आतून बंद असलेल्या दरवाजाचे लॉक दुसऱ्या चावीने उघडले असता आतमध्ये प्रताप यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडला होता. स्वत:च्या परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)