अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा
By नामदेव मोरे | Updated: September 18, 2022 14:28 IST2022-09-18T14:24:00+5:302022-09-18T14:28:54+5:30
वाशी सेक्टर १५ मध्ये क्लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीची मोटारसायकलस्वाराने छेड काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा
नवी मुंबई :
वाशी सेक्टर १५ मध्ये क्लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीची मोटारसायकलस्वाराने छेड काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी तरूणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चित्रकला क्लासवरून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी निघालेल्या १५ वर्षाच्या मुलीला २५ ते ३० वर्षाच्या तरूणाने थांबविले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तेथून पळ काढला. या प्रकाराविषयी मुलीने तत्काळ घरी जाऊन पालकांना माहिती दिली. पालकांनी वाशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान संबंधीत तरूणाविरोधात भारतीय दंड विधान कलम ५०९ व पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घडलेला प्रकार गंभीर असल्यामुळे पोलिसांनी आरोपीचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे.