ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची टोल नाक्यावर अडवणूक; वाहतूकदाराने जाब विचारताच वाहने टोल फ्री सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:20 IST2020-09-18T00:19:54+5:302020-09-18T00:20:14+5:30
या प्रकरणी गोठीवली गावचे वाहतूकदार दीपक म्हात्रे यांनी टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना धारेधर धरत चांगलेच सुनावले.

ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची टोल नाक्यावर अडवणूक; वाहतूकदाराने जाब विचारताच वाहने टोल फ्री सोडली
नवी मुंबई : आॅक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांची ऐरोली टोल नाक्यावर अडवणूक करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
दिवसेंदिवस राज्यात कोविड १९ चे रुग्ण झपाट्याने वाढत असताना कृत्रिम आॅक्सिजनची कमतरता भासत असल्याने सर्व हॉस्पिटलला आॅक्सिजनपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने आॅक्सिजन बनविणाºया कंपन्या हे आॅक्सिजनची वाहतूक करीत असताना ऐरोली टोलनाक्यावर ही वाहने अडवून जबरदस्तीने टोलवसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोठीवली गावचे वाहतूकदार दीपक म्हात्रे यांनी टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना धारेधर धरत चांगलेच सुनावले. बुधवारी, १६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आॅक्सिजन वायूचा पुरवठा करणारी वाहने अडविण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा या वाहनांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे सकाळी दीपक म्हात्रे यांनी ऐरोली टोलनाक्यावर जाऊन तेथील अधिकाºयांना जाब विचारला असता काही तासांनी वाहने सोडून देण्यात आली.
दरम्यान, या प्रकाराबद्दल ऐरोली टोलनाक्याच्या संबंधित अधिकाºयांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वी आॅक्सिजन वाहतूक पुरवठा करणाºया वाहनांकडून टोल वसुली केली जात होती. त्यानुसार आम्ही टोलची रक्कम घेत होतो. मात्र अशा वाहनांना टोल माफ केल्याचे अधिकृत पत्र शासनाकडून आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही टोलची मागणी करीत होतो.
नवी मुंबईतील अनेक प्लांटमधून आॅक्सिजन वायूचा पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर आदी ठिकाणी ट्रक आणि टेम्पोतून केला जातो. मात्र सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून अशा वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेला असताना टोलसाठी अडवणूक करणे चुकीचे होते. त्यांना जाब विचारल्यानंतर अशी वाहने सोडून देण्यात आली.
- दीपक म्हात्रे, आॅक्सिजन वाहतूकदार, गोठीवली.