शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

'महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ', पनवेलहून महिला मोटरमनचे सारथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:11 IST

म्हस्के यांचे पती, आई-वडील आणि बहिणीने या लोकलमधून प्रवास केला.

कळंबोली : पनवेल रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ४ येथून दुपारी ३.४० मिनिटांनी पनवेल-ठाणे वातानुकूलित लोकल ठाण्याच्या दिशेने धावली. ही लोकल चालविण्याचा पहिला मान महिला मोटरमन मनीषा मस्के, गार्ड स्मिता घोणे यांना मिळाला.म्हस्के यांचे पती, आई-वडील आणि बहिणीने या लोकलमधून प्रवास केला. बारा डब्यांच्या या लोकलगाडीमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. महिला सुरक्षिततेसाठी खास अ‍ॅलर्ट यंत्रणा बसवली आहे. गुरूवारी पनवेल स्थानकावरून ८३ प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास केला. ठाणे ते पनवेल १८५ रुपये तिकीट आहे.या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे आदी उपस्थित होते.ही सेवा आरामदायी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने चांगली असल्याचे ज्योती चव्हाण या महिला प्रवाशाने दिली. स्वयंचलित दरवाजे असल्याने ते चालू गाडीमध्ये बंद असतील. त्यामुळे दरवाजाला लटकणे आणि तिथे उभे राहून गर्दी करणे असे प्रकार घडणार नाहीत. तसेच अपघात होणार नाहीत, असे आशीष शर्मा याने सांगितले.मला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वातानुकूलित रेल्वे चालवण्याची संधी दिली. महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ ठेवला आहे. मोटरमन म्हणून अनुभव मिळणार आहे.रेल्वे प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.- मनीषा म्हस्के, मोटरमन, रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वे