शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

घर सोडून आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 31, 2014 01:53 IST

विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

अनिकेत घमंडी - डोंबिवलीविविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. १८ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत कल्याणसह मुंबईतील रेल्वे स्थानकांत पळून आलेली तब्बल २२० मुले सापडली आहेत. दादर-ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘समतोल फाऊंडेशन’च्या सर्व्हेक्षणातून ही गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईच्या बालसुधार गृहांत अशा मुलांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे या मुलांची रवानगी नेमकी कुठे करायची? हा प्रश्न उभा राहिला आहे, संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘रेल्वे स्थानकांमध्ये अल्पवयीन मुले आढळले की, त्याची विचारपूस करत सुरक्षा यंत्रणेच्या कानावर ही बाब घातली जाते. मुलांना तातडीने बालसुधारगृहात पाठवले जाणे आवश्यक असते. मात्र आता या सुधारगृहांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे केवळ सर्व्हे करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. लांबपल्याच्या गाड्या ज्या स्थानकांमध्ये येतात त्या ठिकाणी प्रामुख्याने अशा मुलांची संख्या अधीक असते. त्यातही ठाणे, कुर्ला, दादर या स्थानकांपेक्षाही कल्याण आणि सीसएसटीमध्ये ते जास्त लवकर आढळतात,’ असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण जंक्शन मध्ये तीन दिवसांत ७० तर सीएसटी स्थानकात तब्बल १५० मुले आढळली. सामाजिक संस्थांची भूमिकाच्पळून आलेल्या मुलांशी मैत्री करून त्यांच्यावर शिबिराच्या माध्यमातून संस्कार केले जातात. त्यानंतर हळुहळू कुटुंबाविषयी माहिती घेतली जाते. खरी माहिती मिळाल्याची खात्री पटली की, त्यांच्या देशभरात कुठेही असलेल्या पालकांशी संपर्क साधणे, त्यांना सर्व माहिती देत मुले सुखरुप असल्याचा विश्वास देणे आदी कामे सुरक्षा यंत्रणांच्या सहाय्याने केली जातात. त्यानंतर मुले पालकांच्या स्वाधीन केली जातात.संस्थेसमोरील अडचणी : कल्याणहून भिवंडीच्या बालसुधारगृहात एखाद्या मुलाला न्यायचे असेल तर त्यासाठी सुमारे १५० रु. खर्च होतो, हा खर्च नेमका करायचा कोणी, हा प्रश्न आहे. संस्थेसमोर खर्चाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे इच्छाशक्ती प्रचंड असली तरी कामात अडचणी येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.कलेक्टरचे सहकार्य हवे : जिल्हाधिकाऱ्यासह बालकल्याण समितीने या संदर्भात सहकार्य करणे अपेक्षित असून १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालसुधारगृहातील मुलाचे अपहरणभिवंडी : कचेरीपाडा येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना काल पहाटे ५-१०च्या सुमारास घडली. या मुलाचे नांव इजाज फिरोज शाह(७) असे आहे. कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार बालसुधारगृहातील वैभव भगवान वेल्हाळ यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.