एनआरआय पोलिसांचा मसाज पार्लरवर छापा
By Admin | Updated: April 11, 2017 02:20 IST2017-04-11T02:20:37+5:302017-04-11T02:20:37+5:30
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या

एनआरआय पोलिसांचा मसाज पार्लरवर छापा
नवी मुंबई : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेचीही या वेळी सुटका केली आहे.
सीवूड्स सेक्टर-४४ मधील शांती निवास या इमारतीत असलेल्या ब्युटी स्टुडिओ फॅमिली सलुन अॅण्ड स्पा साईन ग्लो या नावाचे मसाज पार्लर आहे. मसाज पार्लरच्या आडून तेथे वेश्या व्यवसाय चालविला जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
शनिवारी मध्यरात्री या मसाज पार्लरमध्ये एक बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे,
व त्यांच्या पथकाने या छापा मारून मसाज पार्लर चालविणाऱ्या सुरेखा कुंभार या
महिलेला रविवारी पीटा कायद्यांतर्गत अटक केली. तसेच वेश्या व्यवसायासाठी
आणलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली.
या छाप्या दरम्यान, पार्लरमधून रोख रक्कम आणि काही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)