एनएमएमटीच्या तीन रिंगरूट मार्गांना सुरुवात

By Admin | Updated: February 14, 2016 03:15 IST2016-02-14T03:15:54+5:302016-02-14T03:15:54+5:30

एनएमएमटीने नव्या तीन मार्गावर रिंगरूट बससेवा शनिवारपासून सुरू केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कोपरखैरणे, नेरूळ व वाशी विभागांतर्गतच्या मार्गाने

NMMT's three ringy routes begin | एनएमएमटीच्या तीन रिंगरूट मार्गांना सुरुवात

एनएमएमटीच्या तीन रिंगरूट मार्गांना सुरुवात

नवी मुंबई : एनएमएमटीने नव्या तीन मार्गावर रिंगरूट बससेवा शनिवारपासून सुरू केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कोपरखैरणे, नेरूळ व वाशी विभागांतर्गतच्या मार्गाने या बस फिरणार आहेत.
शहरातील प्रवासी नागरिकांना वाहतुकीची सुविधा देण्यासाठी बेस्ट व एनएमएमटी प्रशासन कार्यरत आहे. या दोन प्रशासनांकडून विविध मार्गांवर बस सुविधा पुरवली जात आहे. मात्र सर्वच बस प्रत्येक विभागातल्या प्रमुख मार्गाने धावतात. त्यामुळे मुख्य मार्गापासून लांब राहणाऱ्या नागरिकांना पायपीट करीत बस पकडावी लागते. तर वाशी, तुर्भे, पनवेल, खारघर व ऐरोली रेल्वे स्थानक वगळता इतर रेल्वे स्थानकांपासून सुटणारी बस नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांची मनमानी सहन करावी लागते. त्यामुळे मुख्य मार्गाव्यतिरिक्त रहदारीच्या इतर मार्गांवरदेखील बससेवा सुरू करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत होती. याची दखल घेत एनएमएमटीने नव्या तीन मार्गांवर रिंगरूट बस सुरू केल्या आहेत. कॉलनीअंतर्गतच्या रस्त्यांवर मोठ्या बस चालवणे अशक्य असल्याने रिंगरूटकरिता लांबीने छोट्या बस वापरल्या जात आहेत.

कोपरखैरणे रेल्वेस्थानक ते सेक्टर १७ परिसरातुन परत रेल्वेस्थानक, नेरुळ (पश्चिम) रेल्वेस्थानक ते सेक्टर २२,२४,२८, एल.पी पर्यंत व वाशी रेल्वेस्थानक ते सानपाडा मोराज मार्गे उलवे असे हे तिन नवे मार्ग आहेत.

Web Title: NMMT's three ringy routes begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.