ऐरोलीत एनएमएमटी बसला आग
By नामदेव मोरे | Updated: October 2, 2023 21:46 IST2023-10-02T21:46:12+5:302023-10-02T21:46:44+5:30
आगीत बस जळून खाक झाली आहे.

ऐरोलीत एनएमएमटी बसला आग
नामदेव मोरे, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसला ऐरोली सेक्टर ८ मध्ये आग लागली. आगीत बस जळून खाक झाली आहे.
मार्ग क्रमांक १४४ वरील एनएमएमटी बस क्रमांक ९६८९ सेक्टर ८ मधून जात असताना बसमधून धूर निघू लागला. काही क्षणात बसने पेट घेतला. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणी जखमी झाले नाही. तत्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले. नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यास सुरूवात केली.तोपर्यंत बसचे खूप नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.