शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:23 IST

सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नवी मुंबई : एनएमएमटीचा ब्रेक फेल होऊन तीन वाहनांना धडक दिल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शहरातील बहुतांश ठिकाणचे सिग्नल मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत, यामुळे अनेक चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा उडत आहे. त्यात शहरांतर्गतच्या रस्त्यांसह ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल या मुख्य मार्गांचाही समावेश आहे, यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असतानाच गुरुवारी दुपारी सानपाडा जंक्शन येथे विचित्र अपघात घडला. सायन-पनवेल मार्गावरून एपीएमसीकडे वळण घेणारी एनएमएमटी पुलाखाली रस्ता ओलांडत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला, यामुळे सदर बस रिक्षा, कार व टेम्पो अशा तीन वाहनांना धडकून रस्त्याच्या सुमारे अडीच फुटांच्या दुभाजकावर चढली. यामुळे विरुद्ध दिशेच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनालाही तिची धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. अपघातानंतर सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची कबुली एनएमएमटी चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातामध्ये कार, टेम्पो व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.या दुर्घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. एनएमएमटीच्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. अर्ध्या प्रवासात इंधन संपणे, ब्रेक फेल होणे, चाक निखळणे, असे प्रकार एनएमएमटीच्या वाहनांसोबत घडत आहेत, यामुळे त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई