Newborn infants found on the sidewalk | पदपथावर आढळले नवजात अर्भक

पदपथावर आढळले नवजात अर्भक

नवी मुंबई - वाशी येथे पदपथावर नवजात अर्भक आढळल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांकडून त्याची माहिती मिळताच पोलिसांनी हे अर्भक ताब्यात भेटले आहे. याप्रकरणी वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 15 येथील पदपथावर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मृत अर्भक असल्याची बाब पादचाऱ्यांच्या निदर्शनास आली. एकांताची संधी साधून अज्ञातांकडून ते त्या ठिकाणी टाकण्यात आले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार वाशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले. ते ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Newborn infants found on the sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.