नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व्हिस रस्त्याची फरफट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:42 AM2018-09-20T04:42:50+5:302018-09-20T04:43:15+5:30

स्थायी समितीत प्रस्ताव नामंजूर; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nerul continues to serve TTC industrial services road | नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व्हिस रस्त्याची फरफट कायम

नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व्हिस रस्त्याची फरफट कायम

Next

नवी मुंबई : नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याचे काँक्रीटीकरण करून सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला होता; परंतु या रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार कामे वेळेवर करीत नसून, या कंत्राटदाराला यापूर्वी देण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे अर्धवट असल्याचा आरोप करीत स्थायी समिती सदस्यांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्यात यावा, तसेच या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यानुसार स्थायी समितीने सदरचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे सध्या तरी नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना सर्व्हिस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे.
नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये माल वाहून नेणाºया जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या ठिकाणी असलेल्या उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतचा जुना डांबरी रस्ता असून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सायन-पनवेल महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे तुर्भेहून पनवेलच्या दिशेने जाणाºया वाहनचालकांनी या सर्व्हिस रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्रात कामानिमित्त ये-जा करणारे वाहनचालक आणि नागरिक हैराण झाले आहेत. या सर्व्हिस रस्त्याचे काँक्रीटीकरण करून सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ३८ कोटी ३0 लाख रु पये खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी मांडला होता.
या कामाच्या निविदा प्रक्रि येत कामासाठी पात्र ठरलेल्या मे. अजवानी इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. या कंत्राटदाराची पालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली सीबीडी, वाशी, ऐरोली आणि दिघा या चार ठिकाणची कामे संथ गतीने सुरू असून कामे पूर्ण करण्याचा कालावधी लोटूनदेखील कामे पूर्ण झाली नसल्याचा आरोप करीत स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला.
या कंत्राटदाराला सदर रस्त्याचे काम देण्यात येऊ नये, तसेच या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. प्रस्ताव नामंजूर झाल्याने या कामाला आणखी उशीर होणार असून नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर करणाºया नागरिकांना आणि वाहनचालकांना रस्ता दुरुस्तीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

या रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराची सुरू असलेली कामे किती पूर्ण झाली आहेत, याची माहिती मिळण्यासाठी हा प्रस्ताव मागील बैठकीत प्रलंबित ठेवला होता. कामाच्या मंजुरीपूर्वी त्याबाबत माहिती देण्यात यावी.
- डॉ. जयाजी नाथ,
नगरसेवक,
राष्ट्रवादी

शहरात वाशी, ऐरोली, सीबीडी आणि दिघा अशा चार ठिकाणी या कंत्राटदाराची मोठी कामे सुरू आहेत. या कंत्राटदाराने आजपर्यंतची कोणतीच कामे वेळेत पूर्ण केली नसून, नेहमी मुदतवाढ देण्यात आली आहे. कामांना उशीर होत असल्याने दोन कामांसाठी दंडही लावण्यात आला आहे.
- मोहन डगावकर,
शहर अभियंता

टाइमपास कंत्राटदारांमुळे शहराचा विकास रखडला आहे, ज्या ठेकेदाराची वेळेवर कामे होत नसतील, त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे. मे. अजवानी इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. या ठेकेदाराला कोणतेही नवीन काम देऊ नये, हे काम रिकॉल करण्यात यावे.
- शिवराम पाटील,
नगरसेवक, शिवसेना

अजवानी या कंत्राटदाराला मोठमोठी कामे दिली आहेत. विकासकामे वेळेवर पूर्ण होत नसतील, तर त्या कामांचा नागरिकांना काय फायदा कंत्राटदाराकडून हेतुपुरस्सरपणे कामाला विलंब केला जात असून, अशी मानसिकता असलेल्या कंत्राटदाराला कामे देऊ नयेत.
- द्वारकानाथ भोईर, नगरसेवक, शिवसेना

Web Title: Nerul continues to serve TTC industrial services road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.