जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे

By Admin | Updated: April 21, 2016 02:46 IST2016-04-21T02:36:50+5:302016-04-21T02:46:23+5:30

नवीन धरणे बांधण्यापेक्षा जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे आहे. गावे टँकरमुक्त करण्यासाठीच जलसंवर्धनाची चळवळ उभारली जात आहे

Need to start the sludge of old dams | जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे

जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे

अलिबाग : नवीन धरणे बांधण्यापेक्षा जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे आहे. गावे टँकरमुक्त करण्यासाठीच जलसंवर्धनाची चळवळ उभारली जात आहे. पावसाचे पाणी भूगर्भात जिरवून पाण्याची पातळी वाढविली, तर पाण्याची कमतरता भासणार नाही, असा ज्ञानरूपी संदेश सचिन धर्माधिकारी यांनी दिला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जलसंवर्धनांतर्गत जिल्ह्यातील विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्यातील २४८ विहिरींची स्वच्छता करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील विहिरीच्या सफाईला सुरुवात करून या मोहिमेचा शुभारंभ सचिन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक आणि विद्युत कारणांमुळे पाणी सर्वाधिक वाया जाते. पारंपरिक पाणी काढण्याच्या पध्दती लोप पावल्या आहेत. पाण्याचा उपसा ज्याप्रमाणात होतो त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Need to start the sludge of old dams