महापालिका स्मार्ट हवी

By Admin | Updated: June 26, 2016 00:29 IST2016-06-26T00:29:05+5:302016-06-26T00:29:05+5:30

खारघरसारख्या शहराचा संपूर्ण विकास होणे बाकी आहे. सिडकोचे आरक्षित भूखंड महापालिकेला वर्ग करायला हवेत. तसेच कराच्या स्वरूपात नागरिकांवर बोजा पडणार नाही याची शाश्वती

Need a municipal smart | महापालिका स्मार्ट हवी

महापालिका स्मार्ट हवी

पनवेल : खारघरसारख्या शहराचा संपूर्ण विकास होणे बाकी आहे. सिडकोचे आरक्षित भूखंड महापालिकेला वर्ग करायला हवेत. तसेच कराच्या स्वरूपात नागरिकांवर बोजा पडणार नाही याची शाश्वती असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रि या संकल्प प्रतिष्ठानचे अजय माळी यांनी दिली. तर सद्य:स्थितीत कळंबोलीसारख्या शहराची दयनीय अवस्था झालेली आहे. पावसाळ्यात कळंबोलीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होते. महापालिका झाल्यानंतर या परिस्थितीत बदल घडणे आवश्यक आहे. महापालिका खरोखर स्मार्ट असावी, असे मत कळंबोलीमधील मधुसूदन लाड यांनी व्यक्त केले आहे. पनवेल नगर परिषद हद्दीसह सिडको नोडमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. दरवर्षी ही समस्याच मोठ्या प्रमाणात असते. महापालिका स्थापन झाल्यानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रात पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे अन्यथा सिडकोवर मोर्चा काढणारे नागरिक महापालिकेवरही मोर्चा काढतील, हे मात्र निश्चित असल्याचे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Need a municipal smart