शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईकर सज्ज, २५ तारखेला मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:16 IST

बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुक्कामासाठी तीन जागांच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली. 

नवी मुंबई : आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा २६ जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार आहे. २५ तारखेला आंदोलक नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार असून त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुक्कामासाठी तीन जागांच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली. 

राज्यातील मराठा समाजामधील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान २५ जानेवारीला आंदोलक नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. या सर्व आंदोलकांना जेवण, पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चासह सर्व संघटना प्रयत्नशील राहणार आहेत. 

वास्तव्यासाठी तीन जागांवर चर्चामोर्चाचे नियोजन करण्यासाठी बुधवारी घणसोलीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांना कुठे वास्तव्य करता येईल या ठिकाणांवरही चर्चा करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र व गणपतशेठ तांडेल मैदानाच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली. 

स्वच्छतेकडेही लक्षसर्व मराठा समन्वयक, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शक्य ते योगदान देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. आंदोलकांसाठी वैद्यकीय सुविधा, शौचालय, जेवण, पाणी व इतर सोय करण्यासाठी विविध पथके तयार केली जाणार आहेत. साफसफाईवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चा व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक आयोजित करून आवश्यक ती नियोजनाचा आराखडा तयार करून सर्वांना जबाबदारीचे वितरणही केले जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण