शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

प्रत्येक आंदोलनानंतर तोडपाणी केलं; मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:53 IST

पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न होत अहे, असा आरोपही संजीवनी यांनी यावेळी केला आहे.

नवी मुंबई - कामगारांच्या प्रश्नांवर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेविरोधात केलेल्या प्रत्येक आंदोलनानंतर ठराविक रकमेची तोडपाणी केली, असा गंभीर आरोप काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी केला आहे. तसेच अवघ्या 6 ते 7 वर्षात त्यांनी कोणताही उद्योग नसताना कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याच बरोबर, यासंदर्भात आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही संजीवनी यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजीवनी म्हणाल्या, राजकारणात एक वेगळा चेहरा असतो, खरा चेहरा दिसत नाही. राजकारणातला चेहरा मुखवटा असतो. गजानन काळे यांनी कामगारांचे प्रश्न मांडल्यानंतर प्रत्येक कामगाराकडून पैसा घेतला आहे. प्रत्येक कामगारांने एक अमाउंट त्यांना दिली आहे. याशिवाय, पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न होत अहे, असा आरोपही संजीवनी यांनी यावेळी केला.

अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - पत्नीच्या तक्रारीवरून मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. गजानन काळेंवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळेंचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न; पोलीसांकडून शोध सुरूच - कौटुंबिक हिंसाचार व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. पत्नीच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच काळे भूमिगत झाल्याने त्यांना अटक होऊ शकलेली नाही. 

"गजानन काळे यांचे विवाहबाह्य संबंध न थांबल्याने आपण पोलीसांकडे धाव घेतली" -नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने नेरुळ पोलीसांकडे तक्रार केली आहे. त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह असूनही लग्नानंतर आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय काळे यांच्याकडे भ्रष्टाचाराचा भरमसाठ पैसा येत असतानाही घरखर्चाला मात्र त्यांनी हात आखडता घेऊन आपल्याला सदैव दुर्लक्षित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्यांचे विवाहबाह्य असलेले संबंध देखील न थांबल्याने आपण पोलीसांकडे धाव घेतल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. 

पत्नीनेच केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे काळे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. तर भष्टाचाराच्या आरोपामुळेदेखील भविष्यात त्यांच्यापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळेंवर अटकेच्या कारवाईचे संकट असल्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर काळे यांच्याकडून आरोपांचे खंडन केले जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. 

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliceपोलिसRaj Thackerayराज ठाकरेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका