लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:56 IST2024-12-24T18:55:54+5:302024-12-24T18:56:13+5:30

Navi Mumbai: मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी  करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी  पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

Navi Mumbai: Panvel RTO junior clerk caught taking bribe; Case registered against three | लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल 

लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल 

- अरुणकुमार मेहत्रे 
कळंबोली - मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी  करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी  पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाच ही समाजाला लागलेली एक कीड आहे. बक्कल पगार असतांनाही  शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाच स्विकारली जात आहे. त्यात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय अग्रेसर असल्याचे सोमवारी झालेल्या कारवाईत दिसून आले आहे. मेरीडाईन कंपनीच्या ३२ ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता  प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे ३२ गाड्यांचे  ३२ हजार रुपयाची मागणी आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदिप बासरे यांनी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रारदाराने रितसर तक्रार दाखल  केली होती.

त्या तक्रारीनुसार बासरे पैशाची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.  एसीबीकडून सापळा लावण्याचे ठरले.  सोमवारी बासरे यांनी  संपूर्ण रक्कम न घेता १५  हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १३ हजार रुपये  देण्याचे ठरले. सोमवारी एसीबीच्या अधिकारी यांनी पनवेल आरटीओ कार्यालयात सापळा लावला असता कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी  बासरे ( वय ४५ वर्ष  ) यांनी रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. त्याचबरोबर यासाठी मदतनिस म्हणून खासगीत काम करणारे कल्पेश अनंत  कडू (वय ३१ वर्ष ) , कपिल वामन पाटील ( वय ४५ वर्ष ) या तिघांनाही एसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच प्रकरणी पनवेल आरटीओ चर्चेत 
लाच मागितल्या प्रकरणी वारंवार होणा-या कारवाईतून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय चर्चेत आले आहे. २०२३ मध्ये कारवाई झाल्यानंतर लागलीच डिसेंबर २०२४ मध्ये सोमवारी कारवाई झाली आहे. आरटीओ कार्यालय स्थापन झाल्यापासून ही चौथी कारवाई झाली आहे. त्यात सहाय्यक आरटीओ अधिकारी, खासगी मदतनिस, खासगी एजेंट ,कनिष्ठ लिपीक यांचा समावेश आहे.

Web Title: Navi Mumbai: Panvel RTO junior clerk caught taking bribe; Case registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.