नवी मुंबईमध्ये २४० रुग्ण वाढले, संख्या पोहोचली १०,८७६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:17 IST2020-07-18T00:17:25+5:302020-07-18T00:17:50+5:30
शुक्रवारी सर्वाधिक ४३ रुग्ण कोपरखैरणेमध्ये वाढले असून, तेथील एकूण रुग्णसंख्या तब्बल १,८४७ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये २४० रुग्ण वाढले, संख्या पोहोचली १०,८७६ वर
नवी मुंबई : शहरात शुक्रवारी २४० रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या १०,८७६ झाली आहे. उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विविध उपाययोजना केल्या जात आहेत.लॉकडाऊन घोषित केल्यापासून तीन दिवसांचा अपवाद वगळता, रोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. शुक्रवारी सर्वाधिक ४३ रुग्ण कोपरखैरणेमध्ये वाढले असून, तेथील एकूण रुग्णसंख्या तब्बल १,८४७ झाली आहे. दिघ्याचा अपवाद वगळता इतर सात विभागांमध्ये एक हजारपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत.
शहरात एकूण मृतांची संख्या ३३० झाली आहे, तर २१२ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६,७३२ झाली आहे.