बेलापूरमधील गुन्ह्याचा सीबीआयने मागवला अहवाल. 'नीट'च्या परीक्षेत बसली होती डमी उमेदवार
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 4, 2024 19:13 IST2024-07-04T19:13:20+5:302024-07-04T19:13:51+5:30
Navi Mumbai News: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या अनुशंघाने सीबीआयने सीबीडीत दाखल असलेल्या गुन्ह्याचा देखील अहवाल मागवला आहे. मे महिन्यात झालेल्या नीटच्या परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी उमेदवार पकडण्यात आला होता. जळगाव येथील तरुणीच्या जागेवर राजस्थानमधील तरुणी परीक्षेसाठी बसली होती.

बेलापूरमधील गुन्ह्याचा सीबीआयने मागवला अहवाल. 'नीट'च्या परीक्षेत बसली होती डमी उमेदवार
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - नीट पेपरफुटी प्रकरणाच्या अनुशंघाने सीबीआयने सीबीडीत दाखल असलेल्या गुन्ह्याचा देखील अहवाल मागवला आहे. मे महिन्यात झालेल्या नीटच्या परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी उमेदवार पकडण्यात आला होता. जळगाव येथील तरुणीच्या जागेवर राजस्थानमधील तरुणी परीक्षेसाठी बसली होती.
मे महिन्यात निटच्या झालेल्या परीक्षेत बेलापूर मधील केंद्रावर डमी उमेदवार पकडण्यात आली होता. जळगाव येथील परीक्षार्थी मयुरी पाटील हिच्या ऐवजी राजस्थानची निशिका यादव परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसलेली होती. मात्र त्यांची चलाखी तज्ञांच्या लक्षात आल्याने परीक्षा संपताच निशिका हिच्याकडे केलेल्या चौकशीत ती डमी उमेदवार असल्याचे समोर आले होते. यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तर मूळ उमेदवार मयुरी पाटील हिला देखील सीबीडी पोलिसांनी अटक केलेली आहे.
नुकतेच झालेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्या अनुशंघाने बेलापूर मध्ये बसलेल्या डमी उमेदवाराची देखील चौकशी सीबीआय मार्फत केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी बेलापूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा अहवाल मागवण्यात आला आला आहे. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी महासंचालक कार्यालयास त्यांचा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सीबीडी येथील डमी उमेदवार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात इतरही काहींची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याद्वारे संबंधितांचा शोध सुरु असून त्यामध्ये परीक्षार्थींना डमी उमेदवार पुरवणारी व्यक्ती अटकेत येण्याची शक्यता आहे.