CIDCO Water Cut: खारघर आणि तळोजा परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळाने आज (शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६) या भागात तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बेलापूर येथील मुख्य हेटवणे जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सिडकोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दुरुस्तीचे काम आज सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आले असून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजेज सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. बेलापूर येथील मुख्य हेटवणे जलवाहिनी दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात होणारा मोठा पाणीपुरवठा खंडित होण्याचा धोका टाळण्यासाठी आणि यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी हा नियोजित शटडाऊन घेण्यात येत असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री ९ नंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केला जाईल. मात्र, कामाच्या स्वरूपामुळे सुरुवातीच्या काळात पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि शुक्रवारी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Web Summary : Kharghar and Taloja residents will face a 12-hour water supply shutdown on February 20, 2026, due to urgent repairs on the main Hetwane pipeline. CIDCO advises residents to store sufficient water beforehand as supply resumes gradually with low pressure afterward.
Web Summary : खारघर और तळोजा के निवासियों को 20 फरवरी, 2026 को मुख्य हेटवणे पाइपलाइन की तत्काल मरम्मत के कारण 12 घंटे पानी की आपूर्ति बंद का सामना करना पड़ेगा। सिडको निवासियों को पहले से पर्याप्त पानी जमा करने की सलाह देता है क्योंकि आपूर्ति बाद में कम दबाव के साथ धीरे-धीरे फिर से शुरू हो जाएगी।