शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होणार, ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 02:30 IST

नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस. पदवी, पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार असून, चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस. पदवी, पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार असून, चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे.कॉलेज आॅफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जन (सी.पी.एस.) अभ्यासक्रमाचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा महत्त्वाचा निर्णय असून, शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य असल्याचे या वेळी सुतार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या मनोगतात नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा आरोग्यसेवेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता जाणून येथील डॉक्टरांची कमतरता दूर होण्याकरिता सी.पी.एस. अभ्यासक्र म सुरू करण्याचे ठरविले आणि यामध्ये शासनाचे संबंधित अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच अत्यंत अल्प कालावधीत आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून याचे उद्घाटन संपन्न होत असल्याचा आनंद व्यक्त केला.सार्वजनिक रु ग्णालय, वाशी येथे बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रि या विभाग, अस्थीरोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, वैद्यकशास्त्र विभाग, त्वचारोग विभाग, नेत्ररोग विभाग, बधिरीकरण विभाग, प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग अशा एकूण ११ विभागांकरिता एकूण ३० डॉक्टर्स २४ तास उपलब्ध होणार आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रु ग्णालय, नेरु ळ व माता बाल रु ग्णालय, बेलापूर येथे बालरोग व स्त्रीरोग या दोन विभागांकरिता एकूण आठ डॉक्टर्स आणि राजमाता जिजाऊ सार्वजनिक रु ग्णालय, ऐरोली येथे सहा डॉक्टर्स २४ तास उपलब्ध होणार आहेत. सी.पी.एस. कोर्सचा अभ्यासक्र म पदविकांसाठी दोन वर्षांचा व पदवीसाठी तीन वर्षांचा कालावधी असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेकडे पहिल्या वर्षी ४६ डॉक्टर्स, तर तीन वर्षांनंतर प्रत्येक वर्षी १०० पेक्षा जास्त डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत.याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अनिता मानवतकर, उषा भोईर, नेत्रा शिर्के, अविनाश लाड, डॉ. जयाजी नाथ, राजू शिंदे व प्रदीप गवस, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, रवींद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. प्रशांत जवादे, डॉ. वर्षा राठोड उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई