शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना दिसतील रंगीत मतपत्रिका; एकूण ३ मते द्यावी लागणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:34 IST

मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत म्हणून अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका असणार आहेत.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई वगळता राज्यभरातील महापालिकांमध्ये यावेळी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होत आहेत. निवडणुका अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून मतदारांसाठी रंगीबेरंगी मतपत्रिका ठेवण्याचा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत म्हणून अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका असणार आहेत. 'अ' जागेसाठी पांढऱ्याच्या, 'ब' जागेसाठी फिकट गुलाबी, 'क' जागेसाठी फिकट पिवळा, आणि 'ड' जागेसाठी फिकट निळा रंग असणार आहे.

'एक जागा, एक मत'मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांनी कोणत्याही जागेसाठी फक्त एकच मत देणे आवश्यक आहे. 'एक जागा, एक मत' या सूत्रानुसार मतदारांनी अ, ब, क, ड जागांपैकी प्रत्येकी एक उमेदवार निवडावा लागणार आहे. चारही जागांसाठी बटणे दाबून मतदान केल्यानंतर, शेवटी 'बीप' असा आवाज येईल जो मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची खात्री देईल. मतदारांना त्यांचा उमेदवार नको असल्यास 'नोटा' या पर्यायाचा उपयोग करता येईल.

नव्या पद्धतीमुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल, तसेच मतदारांचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकांचे हे रंगीत चित्र लवकरच मतदारांच्या समोर येणार आहे आणि यामुळे निवडणुकीत नवी रंगत भरणार आहे.

बहुसदस्यीय पद्धतीप्रत्येक नवी मुंबईकराने यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.१ ते २७ क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांनी अ, ब, क, ड या प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ४ मते तसेच प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांनी अ, ब, क या ३ जागांमधील प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण ३ मते द्यावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Colorful Ballots for Voters; Must Cast Three Votes Total

Web Summary : Navi Mumbai municipal elections introduce colored ballots for easy voting. Voters must cast one vote for each seat (A, B, C, D), totaling four votes in most wards and three in ward 28. 'NOTA' option available. The initiative aims for a smoother, less confusing election process.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६