नवी मुंबई महानगरपालिकेने केला रुग्णालयाचा परवाना रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 10:50 PM2020-09-23T22:50:07+5:302020-09-23T22:50:24+5:30

नवी मुंबईमध्ये परवानगी नसताना ही काही रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation cancels hospital license | नवी मुंबई महानगरपालिकेने केला रुग्णालयाचा परवाना रद्द 

नवी मुंबई महानगरपालिकेने केला रुग्णालयाचा परवाना रद्द 

Next

नवी मुंबई  : परवानगी नसताना ही कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांवर मनपाने कारवाई सुरू केली आहे. वाशीतील पामबीच हाॅस्पिटलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द केला आहे. नवी मुंबईमध्ये परवानगी नसताना ही काही रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. काही रुग्णालयांमध्ये बेकायदेशीरपणे उपचार केले जात असल्याचे पुरावेही दिले होते. आयुक्तांनी या प्रकरणाची छाननी केली असता वाशीतील पामबीच हाॅस्पिटलने नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णालयाचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे. 

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation cancels hospital license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.