नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 23:38 IST2025-10-15T23:37:34+5:302025-10-15T23:38:57+5:30

नवी मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ३४ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. 

Navi Mumbai Municipal Corporation Approves Rs 34,500 Diwali Ex-Gratia for Employees, Highest Ever | नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?

नवी मुंबई: महानगर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ३४५०० रूपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना २८ हजार ५०० व आशा वर्कर यांना १८ हजार ५०० रूपये अनुदान मंजूर करण्यात आले.

महानगर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना ३४५०० इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. गतवर्षीपेक्षा  १५०० रूपये वाढविण्यात आले आहेत.ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २८५०० इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे २८५००  व   आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना १८५०० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

यावर्षी आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही १८ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

Web Title : नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारियों के लिए दिवाली बोनस घोषित: विवरण यहाँ

Web Summary : नवी मुंबई नगर निगम कर्मचारियों को दिवाली बोनस: स्थायी कर्मचारियों को ₹34,500। अनुबंध और आशा कार्यकर्ताओं को क्रमशः ₹28,500 और ₹18,500 मिलेंगे। शिक्षकों और कोविड कर्मचारियों को भी बोनस, त्योहारों में वित्तीय राहत।

Web Title : Navi Mumbai Corporation Announces Diwali Bonus for Employees: Details Inside

Web Summary : Navi Mumbai civic employees get Diwali bonus: ₹34,500 for permanent staff. Contract and ASHA workers receive ₹28,500 and ₹18,500 respectively. The bonus extends to teachers and COVID staff, offering financial relief this festive season.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.