Navi Mumbai: खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग, गँगस्टर देशमुखची आई आणि बहिणीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 22, 2023 17:58 IST2023-08-22T17:57:09+5:302023-08-22T17:58:19+5:30
Navi Mumbai: खंडणी, हत्या तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या विकी देशमुख याच्या आई व बहिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली.

Navi Mumbai: खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग, गँगस्टर देशमुखची आई आणि बहिणीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
नवी मुंबई - खंडणी, हत्या तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या विकी देशमुख याच्या आई व बहिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून पोलिस त्यांना अटक करण्यात हात आखडता घेत होते.
विकी देशमुख याला गोव्यातुन अटक केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्याच्या इतरही साथीदारांना अटक केली. विकीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पाच मोक्का देखील लागले आहेत. त्याच्या गुन्ह्यांमध्ये नातेवाईकांचा देखील सहभाग असल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. मात्र आई व बहिणीला अटक करण्यात पोलिसांकडून हात आखडता घेतला जात होता. यावरून पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अनेकांना मेमो देखील काढला होता. त्यामुळे आई रजनी देशमुख व बहिणी जागृती थोरात यांच्या शोधात पोलिस होते. अखेर गुन्हे शाखा कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री त्यांना अटक केली आहे. देशमुखच्या अटकेनंतर देखील खंडणीची अनेक गुन्हे समोर आले असता ते दाखल करण्यात आले आहेत.