Navi Mumbai International Airport: नवी मुबंई विमानतळ सुरू होण्याच्या दिशेने रविवारी आणखी एक टप्पा पार पडला. ऑक्टोबरमध्ये हवाई दलाचे विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. त्यानंतर आता नवी मुंबईविमानतळाच्या धावपट्टीवर पहिले कर्मशिअल विमान यशस्वीपणे उतरले. हा क्षण या विमानतळासाठी मैलाचा दगड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळ महत्त्वाचे आहे. हे विमानतळावरून लवकर सेवा सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने काम सुरू आहे.
रविवारी (२९ डिसेंबर २०२४) नवी मुंबई विमानतळाच्या उत्तर प्रवेश द्वाराजवळ व्यावसायिक विमान उतरवण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सचे ए३२० हे विमान विमानतळावर यशस्वीपणे उतरल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळासाठी महत्त्वाचा दिवस
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण बन्सल म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा दिवस मैलाचा दगड आहे. व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आल्याने आम्ही म्हणू शकतो की, आता विमानतळावरून सेवा सुरू करण्यापासून एक पाऊल दूर आहोत.
ऑक्टोबर उतरवण्यात आले होत हवाई दलाचे विमान
धावपट्टी तयार झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलाचे विमान उतरवण्यात आले होते. ऑक्टोबरमध्ये धावपट्टीची पहिली चाचणी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमान उतरवले गेले आहे. कोविडची भयंकर साथ असतानाच या विमानतळाचे काम सुरू करण्यात आले. २०२१ मध्ये काम केल्यानंतर २०२५ मध्ये विमानतळ सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.