शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्समध्ये तोटा झाल्यास करायचा छळ, नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 16:46 IST

नवी मुंबई एका पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने रोजच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे.

Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या खारघर परिसरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या ३१ वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खारघर पोलीसांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आठ दिवसांनी गुन्हा दाखल झाला.

खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ मधील इनोव्हेटीव्ह हाईट्स या इमारतीमध्ये ११०२ क्रमांकाच्या घरात अर्चना व आमोध सिंग हे दाम्पत्य राहत होते. आमोध सिंग हा सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. आमोधसोबत अर्चनाचे ३० नोव्हेंबर २०१४ रोजी शी लग्न झाले होता. या जोडप्याला ७ आणि ३ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र आमोदच्या छळाला कंटाळून ३ मे रोजी अर्चनाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

अर्चना यांच्या भाऊ अमनकुमार याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सासरहून हुंड्यासाठी छळ सुरु होता. आमोध पत्नीला मारहाण करायचा आणि आई-वडिलांकडे पैसे मागायचा. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिलेल्या  माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीच्या सांगण्यावरून शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते. पण तोटा झाल्यास तो तिला दोष देत असे. आमोधला पत्नीच्या नावावर असलेली जमीन आणि बँक खाती त्याच्या नावावर आणि कुटुंबीयांच्या नावे करायची होती. त्याने तिला घटस्फोट देण्याची धमकीही दिली होती. 

३ मे २०२४ रोजी अर्चनाने कथितरित्या तिच्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अर्चनाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, शुक्रवारी कलम ३०६,३२३, ५०४  आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसshare marketशेअर बाजार