Navi Mumbai Crime News: इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून तरुणाच्या भेटीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना वाशीत घडली. वेळीच मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून तरुणावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घणसोली परिसरात राहणाऱ्या १६ इन्स्टाग्रामवरील मित्राची प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून तरुणावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामवर ओळख, मुलीसोबत काय घडलं?
घणसोली परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला. पीडित मुलीची इन्स्टाग्रामवरून एका मुलासोबत ओळख झाली होती. त्यांच्यात नियमित होणाऱ्या चॅटिंगवरून दोघांमध्ये मैत्री झाली होती.
त्या मुलाने मुलीला भेटीसाठी वाशी परिसरात बोलावले होते. त्यावरून मुलगी त्या ठिकाणी गेली असता दोघेही तरुणाच्या कारमध्ये बसले होते.
यावेळी तरुणाने कारमध्येच तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. त्याच्या कृत्याला तिने विरोध करून तत्काळ स्वतःची सुटका करून घेतली.
वाशी पोलिसांकडे तक्रार
घडलेल्या प्रकाराबाबत वाशी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून तरुणावर गुन्हा दाखल केला. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुला-मुलींचा गुन्हेगारी सापळ्यात फसण्याचा पहिला प्रकार नाही.
यापूर्वी अनेकांच्या आर्थिक फसवणुकीसोबतच वासनेचे बळी पडल्याचेही प्रकार घडले आहेत. आईने सोशल मीडियापासून लांब राहण्यास सांगितल्याने अल्पवयीन मुलाने घर सोडल्याचा प्रकार घडला असून मोबाइलचा वापर त्रासदायक ठरत आहे.