- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईNavi Mumbai Crime News: नवी मुंबईत शुक्रवारी खळबळ उडाली. किल्ले गावठाण (बेलापूर किल्ला परिसर) येथे एका विकासकाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गुरूनाथ चिंचकर (Gurunath Chinchkar)असे या बिल्डरचे नाव आहे. राहत्या घरात त्यांनी शुक्रवारी आत्महत्या केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवी मुंबईतील किल्ले गावठाण येथील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांच्या मुलांविरोधात दाखल गुन्ह्यात एनसीबीकडून त्यांना चौकशीसाठी बोलवले होते, अशीही माहिती आता समोर आली आहे.
मुलांचे प्रकरण, चिंचकरांनी केली आत्महत्या?
गुरूनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येच्या कारणामागे त्यांच्या मुलांचं प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात गुरूनाथ चिंचकर यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एनसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची दोन्ही मुले फार झाली आहेत. मुलांचा गुन्हेगारी कृत्यातील सहभाग आणि तपास यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवले जात असल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांनी शुक्रवारी घरात असताना गोळी झाडून घेत आत्महत्या केली, अशी माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.