शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या वीजबिलाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा, नवी मुंबई भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:13 IST

नवी मुंबई :  वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी ...

नवी मुंबई :  वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत, अशी माहिती शुक्रवारी २२ जानेवारी रोजी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले असून, व्यवसाय बंद झाले आहेत. याकाळात महावितरणने रिडिंग न घेता सरासरी वीजबिल पाठविली आहेत. याकाळात विजेचे दरदेखील वाढविण्यात आले असून, सक्तीने वीजबिलांची वसुली करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडण्याचे फर्मान राज्य सरकारने काढले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाढीव वीजबिल रद्द करावीत आणि सक्तीने वीजबिल वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली. ३०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. हे आश्वासन खोटे ठरले. कठीण काळामध्ये सरकारने जनतेला दिलासा द्यायला हवा, परंतु या सरकारने जनतेला उद्ध्वस्त करण्याचे ठरवले असल्याचा आरोप माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने अन्यायाची परिसीमा केली आहे. या सरकारचा मनमानी कारभार सुरू असून, जनतेचे गाऱ्हाणे ऐकले जात नसल्याची टीका माझी नगरसेवक अनंत सुतार यांनी केली. नवी मुंबई शहरातून महावितरणला सर्वांत जास्त उत्पन्न वीजबिलामधून मिळते त्या नवी मुंबईतील ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे असल्याचा आरोप माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला. कोरोना काळात महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल वेळेवर देण्यात आली नाहीत त्याचा भुर्दंड मात्र ग्राहकांवर टाकण्यात आला महावितरणची चूक असताना ग्राहकांनी हा भुर्दंड का भरावा? असा सवाल माजी महापौर जयवंत सुतार यांनी केला. वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या वीजबिल वसुलीमुळे नवी मुंबई भाजपतर्फे शहरातील सर्वच नोडमध्ये शुक्रवारी महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलक कार्यकर्त्यांचा सन्मानआमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील वेळेस झालेल्या वीज आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला. जनतेवरील अन्याय नाहीसा करण्यासाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेल न घेता तुरुंगात जाण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यानी दिली.

टॅग्स :electricityवीजbillबिलBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई