Navi Mumbai: दुचाकी चोरणाऱ्या टोळीमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश, दोघांना घेतले ताब्यात, ५ गुन्ह्यांचा उलगडा
By नामदेव मोरे | Updated: August 19, 2023 21:01 IST2023-08-19T21:00:24+5:302023-08-19T21:01:44+5:30
Navi Mumbai : पनवेल, नवी मुंबई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश असल्याचे तासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून ७ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Navi Mumbai: दुचाकी चोरणाऱ्या टोळीमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश, दोघांना घेतले ताब्यात, ५ गुन्ह्यांचा उलगडा
- नामदेव मोरे
नवी मुंबई - पनवेल, नवी मुंबई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश असल्याचे तासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून ७ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या घटना वाढत आहे. रोड, वाहनतळ व इमारतीच्या परिसरात उभी केलेली वाहने चोरटे पळवून नेत आहेत. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानेही शोध मोहिम सुरू केली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप देसाई व पथकाने तळोजा व नेरूळ परिसरातून १७ वर्षाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले. यापैकी एकजण खारघरमध्ये व दुसरा नेरळमधील रहिवासी आहे. त्यांच्याकडून तळोजा, खारघर, सीबीडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ४ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या एकूण ७ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश होता का, अजून काही गुन्हे संबंधीतांनी केले आहेत का याचाही तपास केला जात असून या प्रकरणी पुढील तपास अविनाश काळदाते करत आहेत.