शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अक्षता म्हात्रेच्या हत्येचे दिल्लीत पडसाद

By नारायण जाधव | Updated: July 15, 2024 15:22 IST

पीडित कुटुंबाने अक्षता हिचा नवरा व सासरचे पैशांसाठी मारहाण व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात तिच्या नवऱ्याची व सासरच्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ती

नवी मुंबई : बेलापूर येथील विवाहिता अक्षता कुणाल म्हात्रे हिस शीळफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी चहातून  गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यासोबत अतिप्रसंग केला. शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्यावर दगडांनी वार करून तिची गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. पीडित अक्षता म्हात्रे हिच्या कुटुंबियांना भेटून रविवारी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पीडित कुटुंबाने अक्षता हिचा नवरा व सासरचे पैशांसाठी मारहाण व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात तिच्या नवऱ्याची व सासरच्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करेल. पोलिस प्रशासन किंवा सरकारने कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केला तर काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही लांबा यांनी यावेळी दिला.

पीडित कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल व अक्षताला न्याय मिळून देण्यासाठी जी काही पावले उचलणे गरजेची आहेत ती जबाबदारी लांबा आणि सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यावर सोपवली. यावेळी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला साळवे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणित शेलार, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाध्यक्षांना ठेवले अंधारातकाँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी पीडिता अक्षया म्हात्रे हिच्या कुटुंबियांची भेट घेतली असली, तरी यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक गैरहजर हाेते. याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, लांबा आणि सव्वालाखे यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भेट घेतली, ही चांगली गोष्ट आहे. पीडितेच्या मारेकऱ्यांना सजा व्हायलाच हवी. मात्र दोन्ही महिला नेत्यांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नव्हती. प्रदेश पातळीवरील वा स्थानिक संबंधित कुणी नेत्यांनीही याबाबत कल्पना दिली नव्हती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी