Navi Mumbai: कामोठ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सापाचा शिरकाव, उडाला गोंधळ
By वैभव गायकर | Updated: October 10, 2023 11:37 IST2023-10-10T11:36:46+5:302023-10-10T11:37:11+5:30
Gautami Patil: गौतमी पाटीलची क्रेज संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे.पनवेल मधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दि.9 रोजी गौतमी पाटील आल्या होत्या.

Navi Mumbai: कामोठ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सापाचा शिरकाव, उडाला गोंधळ
-वैभव गायकर
पनवेल - गौतमी पाटीलची क्रेज संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे.पनवेल मधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दि.9 रोजी गौतमी पाटील आल्या होत्या.या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती.मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पहावयास मिळाले.
गौतमी येणार असल्याने पनवेलसह नवी मुंबई मधील तरुण या कार्यक्रमाठीकाणी जमा झाले होते.कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून खाजगी सुरक्षा रक्षकांसह पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.यावेळी काही उत्साही तरुणांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर भिडकावण्याचा प्रकार केला.दरम्यान कार्यक्रमाच्या मध्यंतरी अचानक साप शिरल्याने एकच पळापळ उडाली.एका तरुणांना साप चावल्याची देखील चर्चा याठिकाणी सुरु होती.