शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

‘नासा’च्या उपक्रमात पनवेलच्या प्रणितची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:04 PM

अटकेपार झेंडा : मंगळ ग्रहावरील अवकाश संशोधनाची संधी

पनवेल/अलिबाग : सध्याचे युग हे संशोधनाचे युग असून, अवकाश संशोधन हे सर्वांच्या परिचयाचे व आवडीचे संशोधन क्षेत्र आहे. अमेरिकास्थित ‘नासा’ ही अवकाश संशोधन संस्था जगभरातील नंबर एकची संस्था समजली जाते. याच संस्थेने हाती घेतलेल्या एका उपक्रमासाठी पनवेलमधील प्रणित पाटील या तरु णाची निवड करण्यात आली आहे. प्रणितच्या निवडीमुळे पनवेलचे नाव जगभरात प्रसिद्ध होईल, यात शंका नाही.

नासा’ व डॉ. जॉन सेपनियक यांच्या प्रकल्पांतर्गत अमेरिकेच्या यूहाट प्रांतात मंगळ डीरु ट रिसर्च स्टेशन या ठिकाणी संशोधन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहाची कृत्रिम माती, मातीची निरनिराळी कार्बनयुक्त सयुंगे बनवणे, मंगळ ग्रहाचे कृत्रिम पर्यावरण तयार करून पृथ्वीवरील कृत्रिम बियांची पेरणी करण्यात येणार आहे. या वेळी दिसून येणारे परिणाम या संदर्भात हे संशोधन सुरू आहे.

भविष्यात मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याच्या दृष्टीने हे संशोधन सुरू आहे, याकरिता प्रणित पाटील याचे टीमसह २६ जानेवारी ते ९ फेब्रवारी दरम्यान यूहाट या संशोधन केंद्रावर वास्तव्य होते. संशोधन करताना राहणीमान, जेवण यामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याला दिवस काढावे लागले. बेचव जेवण, टोमॅटोची पावडर, अंघोळीसाठी जेली आदीच्या आधारे या संशोधन केंद्रात दिवस काढल्याचे प्रणित सांगतो. भविष्यात चंद्रावर जाण्याचा योग आल्यास त्यासाठी आवश्यक व उपयुक्त माहिती या संशोधनातून हाती लागल्याचे प्रणित सांगतो.

प्रणित पाटील मूळचा अलिबागचा असला, तरी त्याचे शिक्षण पनवेलमध्ये झाले आहे. १९९१ मध्ये पनवेलमध्ये आल्यावर प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे पूर्ण केले. २०१० मध्ये घाटकोपर येथील प्रतिष्ठित कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून त्याने नऊ महिने काम केले. त्यानंतर २०१०-११ मध्ये अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रु जू झाला. प्रणितचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.

अंतराळ संशोधनाची आवडप्रणितला संशोधनाची आवड असल्याने, त्याने ‘नासा’चे पॉवर पॉइंट अभ्यासले. अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी आॅक्टोबर २०१४ मध्ये एज्युकेशन व्हिजा घेऊन अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या ‘एम्री रिडल एरोनॉटिकल’ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविला. २०१६ मध्ये १६०२ बॅचमध्ये सायंटिस्ट अ‍ॅस्टॉनॉट कँडिडेट या पदासाठी त्याची निवड झाली. जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्याकडून एरोबॅटिक्सचे प्रशिक्षण घेतले. ‘साउदर्न ऐरोमेडिकल इन्स्टिट्यूूट’ मधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अ‍ॅडव्हान्स चेंबर प्रोग्राम’ पूर्ण केला आहे. तसेच ‘स्विस स्पेस सेंटर’ आणि ‘ईपीएफएल’मधून स्पेस मिशन डिझाइन आणि आॅपरेशन कोर्स पूर्ण केला आहे. सध्या ‘नासा’ स्पेस सेंटरचे ‘फिझिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टीम’मध्ये ‘अ‍ॅनालिटिकल युजर’ म्हणूनही तो कार्यरत आहे. 

भारतीय माणसाचे शरीर मंगळ ग्रहासाठी किती सक्षम आहे, याची चाचणी व्हावी. टीममध्ये सांस्कृतिक ठेवा वाढावा, याकरिता मंगळ ग्रहावरील अवकाश मानवी संशोधन करण्यात आले होते. हा अनुभव विस्मरणीय होता. प्रतिकूल परिस्थितीत चंद्रावर वास्तव्य करण्यासंदर्भात उपयुक्त माहिती या संशोधनात कळू शकली.- प्रणित पाटील,मंगळग्रह अवकाश मानवी संशोधक, नासा

टॅग्स :NASAनासाpanvelपनवेल