शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
3
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
4
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
5
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
6
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
7
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
8
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
9
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
10
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
11
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
12
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
13
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
14
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
15
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
16
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
17
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
18
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
19
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
20
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 00:30 IST

नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

- वैभव गायकरपनवेल : नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असून, याविषयी जनजागृती करण्यासाठी नैनिताल येथील पर्यावरणप्रेमी भूपेंद्र मेहरा यांनी सायकलवरून भारतभ्रमण सुरू केले आहे.२०१३ साली उत्तराखंड या ठिकाणी देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलप्रलय आला होता. निसर्गावर मात करत मानवाने पर्यावरणाचे संकट आपल्यावर ओढवल्याने सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१८ मध्ये केरळ राज्यातदेखील जलप्रलय झाले. देशभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवली जात आहे. जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, खाडीकिनारी भराव टाकला जात आहे आदीसह विविध बाबींमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, नैनिताल येथील भूपेंद्र मेहरा यांनी पर्यावरणाचे रक्षण या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास सुरू केला आहे. नुकतेच ते पनवेलमध्ये दाखल झाले होते. दररोज ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात. सायकलवर, ‘आवो सब मिलकर पर्यावरण बचाये, इस धरती को हरभरा बनाये’ हा संदेश एका पाटीवर कोरला आहे. नैनिताल हलदानी या ठिकाणाहून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान भूपेंद्र सिंग मेहरा यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील विविध शहरांमधून मार्ग काढत गोवा या ठिकाणी दाखल होणार आहेत. भूपेंद्र यांनी अशाप्रकारच्या आठ सायकल रॅली यापूर्वी देशभरात काढलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :panvelपनवेल