खून, लूटमार करणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: April 21, 2016 02:54 IST2016-04-21T02:54:25+5:302016-04-21T02:54:25+5:30

कल्याणच्या खडकपाडा भागातील एका तरुणीसह सुरक्षारक्षकाचा खून करुन लॅपटॉप आणि मोबाईल लुटणाऱ्या चार जणांच्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती

The murderer, robbery gang | खून, लूटमार करणारी टोळी जेरबंद

खून, लूटमार करणारी टोळी जेरबंद

ठाणे: कल्याणच्या खडकपाडा भागातील एका तरुणीसह सुरक्षारक्षकाचा खून करुन लॅपटॉप आणि मोबाईल लुटणाऱ्या चार जणांच्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने जेरबंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार आणि कोयत्यासह लॅपटॉप तसेच सोनसाखळी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे टोळीचा सूत्रधार अवघ्या १६ वर्षांचा असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
कल्याणचे रहिवासी असलेले नितिन वाघे (१९), नितेश उर्फ नित्या भोईर (२०), रवींद्र उर्फ रवी वाघे (२०) आणि त्यांचा अल्पवयीन म्होरक्या अशी याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या अल्पवयीन असूनही हल्ला करतांना तो अग्रभागी असायचा. अत्यंत कु्ररतेने त्यांनी या दोन हत्या केल्या. या अल्पवयीन म्होरक्यावर नव्या २०१५ च्या कायद्यानुसार प्रौढ आरोपींप्रमाणेच खटला दाखल करण्याची विशेष परवानगी न्यायालयाकडे मागणार आहेत.
८ एप्रिल रोजी पहाटे १.३० वा. च्या सुमारास शहाडच्या मोहने रोडवरील सिद्धीविनायक डेव्हलपर्स या कॉम्पलेक्समधील सुरक्षारक्षक दीपककुमार महतू आणि संजय यादव यांच्यावर दोन अनोळखींनी खूनाचा प्रयत्न केला होता.तर ९ आणि १० एप्रिलच्या मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास शहाड भागातील लेबर कॅम्प येथील दीपक भोईर या सुरक्षारक्षकाचीही निर्घृणपणे वार करुन हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचा मृतदेह लेबर कॅम्पमधील वाळूच्या ढिगाऱ्यात गाडला होता. त्याच दिवशी म्हणजे १० एप्रिलच्या पहाटे ३ ते ४ वा. च्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या शहाडमधील मंगेशी पॅराडाईज या ठिकाणी मर्क्युरी बल्बची चोरी करणाऱ्यांना अडविणाऱ्या संजय सिंग (२८)या सुरुक्षारक्षकाच्या कपाळावर शस्त्राने वार करुन एका टोळक्याने पलायन केले होते. १४ एप्रिलच्या पहाटे १.३० वा. च्या सुमारास शहाड भागातीलच साईराम सोसायटीमधील एका घरात शिरुन झोपलेल्या प्रिया दरवडे (२२) हिच्या डोक्यावर वार करुन खून करुन सोनसाखळी, सोन्याचा हार आणि मोबाईल लुटला होता. या चारही प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The murderer, robbery gang