स्वच्छता अभियानाला महापालिकेचाच हरताळ; उद्यानातील कचरा प्रक्रिया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 23:38 IST2020-10-05T23:38:01+5:302020-10-05T23:38:11+5:30
नवी मुंबईत फक्त अभियान काळापुरतीच कचऱ्यातून खतनिर्मिती

स्वच्छता अभियानाला महापालिकेचाच हरताळ; उद्यानातील कचरा प्रक्रिया बंद
नवी मुंबई : स्वच्छता अभियनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक उद्यानात कंपोस्ट पीट तयार केले होते. कचºयातून खतनिर्मिती करून त्याचा उद्यानातच वापर केला जात होता, परंतु सद्यस्थितीमध्ये अपवाद वगळता, सर्वच उद्यानातील कचºयावरील प्रक्रिया बंद झाली असून, कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानामध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता अभियानाला महानगरपालिकेनेच हरताळ फासल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ओल्या कचºयाची निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयातून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले होते. मनपाने स्वत: सर्व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार केले होते. उद्यानातील कचºयावर तेथे प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात होती. निर्माण झालेले खत त्याच ठिकाणी वापरले जात होते. अभियान काळात सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या टीमलाही हा प्रयोग दाखविण्यात आला होता, परंतु अभियान संपताच उद्यानांमधील खतनिर्मिती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. महापालिका स्वच्छता अभियानापुरतीच प्रयोग राबविते अशी टीका नागरिकांनी केली आहे.
नागरिक नाराज
सद्यस्थितीमध्ये प्रत्येक उद्यानातील कंपोस्ट पीटमधील कचºयाची माती झाली आहे. काही ठिकाणी खरोखरच पीटमध्ये माती टाकण्यात आली आहे. कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली असून, देखभालही केली जात नाही. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाºया पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.