शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:56 IST

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांकडून रहदारीचे प्रमुख रस्ते, तसेच खेळाची मैदाने व्यापली जात आहेत. मात्र, अशा आठवडे बाजारांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून, गुन्हेगारीवाढीलाही ते कारणीभूत ठरत आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरणारे आठवडे बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ग्रामीण भागातील गरजेची आठवडे बाजाराची ही पद्धत शहरी भागात केवळ अर्थकारणासाठी वापरली जात आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून एका दिवशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता आठवडे बाजार भरवले जातात. त्या ठिकाणी शेतीच्या आवश्यक साधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, भाजेपाल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र, शहरी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने, बाजारपेठा उपलब्ध असल्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गरजा कोणीही सहज भागवू शकतो. त्याकरिता आठवडे बाजाराची आवश्यकता नसतानाही, केवळ काही व्यक्तींच्या पुढाकारातून ते भरवले जात आहेत. त्याकरिता गाव-गावठाणांतील रस्ते, खेळाची मैदाने या ठिकाणी फेरीवाले बसवले जात आहेत. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १००० रुपये भाडे संबंधित व्यक्तीकडून आकारले जात असल्याचेही समजते. तर बाजारात अधिकाधिक फेरीवाले बसावेत, याकरिता शहराबाहेरून फेरीवाल्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने गुन्हगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीही शहरात फेरफटका मारत आहेत.काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेते बनून आलेल्या टोळीने सानपाडा येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु ज्याच्या घरासमोर बाजार भरवला जातो, त्यांनाही संबंधितांकडून रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे; परंतु संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास इतर नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशा वेळी वादाचे प्रकार घडत असून, त्याचे पडसाद हाणामारीतही उमटत आहेत.