शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण : नारायण राणेंच्या नीलेश फार्मला अभय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 3:00 AM

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित झालेल्या नीलेश फार्मला अभय देण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे.

- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित झालेल्या नीलेश फार्मला अभय देण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे. हे फार्महाउस माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मालकीचे असल्याने प्रशासनाने चालढकल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संतोष ठाकूर यांनी केला आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांची पत्नी नीलम राणे यांची २१३० चौ.मी. जागा संपादित झाली आहे. संपादित जागेचा मोबदलाही राणे कुटुंबीयांना मिळाला असून, ही रक्कम जवळपास ८० लाखांच्या आसपास आहे. संबंधित जागेची भरपाई देऊनही या जागेला अभय देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. संपादित होऊन आणि मोबदला देऊनही रुंदीकरणात नीलेश फार्मची जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. या ठिकाणाहून रस्त्याला वळण देण्यात आलेले आहे. कर्नाळा परिसरात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर १३२० चौ.मी. वरकस जमीन महामार्गाकरिता संपादित केल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. याचबरोबर नारायण राणे यांची ८१० चौ.मी. जागा रुंदीकरणात गेल्याची कागदोपत्री नोंद आहे. वास्तविक, नीलेश फार्महाउसची संरक्षण भिंत आजही तशीच आहे. तारा गावातील अजय पाटील यांनी माहितीच्या अधिकारात हे उघड केले आहे. पाटील हे मुंबई-गोवा महामार्गबाधित आहेत. त्यांनी या संदर्भात पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.दरम्यान, राणे यांनी या जागेचा मोबदला एप्रिल महिन्यात स्विकारल्याने भूसंपादनाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पेणच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.हा प्रशासनाचा विषयमुंबई-गोवा महामार्गालगत जवळपास ७० टक्के लोकांना भूसंपादनाची रक्कम मिळालेली आहे. फक्त राणेंना त्याचे पैसे मिळाले असे नाही. दोन वर्षांपूर्वी इथे मार्किंग करण्यात आले. तेव्हाही आम्ही रूंदीकरण किंवा संपादनाला विरोध केला नाही किंवा आक्षेपही घेतला नाही. आजही आमचा कसलाच विरोध नाही. संपादन का झाले नाही, कारवाई का झाली नाही, या प्रश्नांचे उत्तर तर प्रशासनच देऊ शकेल. आम्ही या प्रक्रियेत कधीच हस्तक्षेप केलेला नाही, अशी भूमिका नीलेश राणे यांनी मांडली.मुंबई-गोवा महामार्गबाधित ग्रामस्थांची घरे त्वरित पाडण्यात आली. २०१५ मध्ये ग्रामस्थांना भूसंपादन कायद्याअंतर्गत मोबदला देण्यात आला. यामध्ये नारायण राणेंच्या नीलेश फार्मचाही समावेश असताना त्यांच्या फार्मला अभय का? सर्वसामान्यांना एक न्याय आणि नारायण राणेंना एक न्याय, असा कारभार सुरू आहे.- संतोष ठाकूर,सामाजिक कार्यकर्तेखातेदाराचे नाव गट नं. एकूण क्षेत्रफळ नुकसान भरपाईची रक्कमनीलम नारायण राणे १६७/१ १३२० चौ.मी ४३,३७,५५६नारायण तातू राणे १६७/२ ८१० चौ.मी. ३६,७८,०१५

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Navi Mumbaiनवी मुंबई