मराठा आंदोलकांवरील हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन

By नामदेव मोरे | Updated: September 6, 2023 12:51 IST2023-09-06T12:50:35+5:302023-09-06T12:51:24+5:30

वाशी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाने निदर्शने केले.

Movement of Mahavikas Aghadi to protest the attack on Maratha protesters | मराठा आंदोलकांवरील हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन

मराठा आंदोलकांवरील हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन

नवी मुंबई: जालना मधील मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईत महाविकास आघाडीने आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडविला नाही तर रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा देण्यात आला.

वाशी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाने निदर्शने केले. शांततेत आंदोलन करणा-या मराठा समाजाच्या नागरिकांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध केला. लाठीचार्ज ला जबाबदार सर्वांवर कारवाई करावी. तत्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. आरक्षण तत्काळ न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. 

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोरे,रंजना शिंत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रशांत पाटील, सलुजा सुतार, राजू शिंदे, चंद्रकांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Movement of Mahavikas Aghadi to protest the attack on Maratha protesters