नेने महाविद्यालयात आंदोलन

By Admin | Updated: June 23, 2016 03:34 IST2016-06-23T03:34:46+5:302016-06-23T03:34:46+5:30

पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर मनमानी कारभाराचा आरोप ठेवीत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी सोमवारी

Movement in Nene College | नेने महाविद्यालयात आंदोलन

नेने महाविद्यालयात आंदोलन

पेण : पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर मनमानी कारभाराचा आरोप ठेवीत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी सोमवारी महाविद्यालयासमोर मुंबई विद्यापीठ टिचर्स युनियनच्या माध्यमातून धरणे आंदोलन करीत सतीश धारप यांना हटविण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे विद्यापीठ स्तरावरून होणारा पत्रव्यवहार, नॅकचे कामकाज करण्यास प्राध्यापकवर्गाची टाळाटाळ व विनाअनुदानित तुकड्या बंद करण्याचे विद्यापीठाचे आदेशाचे उल्लंघन मी करू शकत नाही. विद्यापीठ कायद्याच्या चौकटीत राहूनच मला काम करावे लागते, अशी धरणे आंदोलनाबाबत प्राचार्य धारप यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे प्राचार्य विरुध्द प्राध्यापक असा संघर्ष नेने महाविद्यालयात उभा ठाकला आहे.
पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात गतवर्षीपासून शास्त्र विभागाची वेळ दुपारी करण्यात आली असता यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. संस्था प्रमुखांनी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधूनच सायन्स शाखेसंबंधात वेळेच्या वादावर पडदा टाकला होता. गतवर्षीचा ट्रेलरचा शो यावर्षी मात्र प्राध्यापक वर्गाने स्वत:कडे घेत थेट प्राचार्यांवरच आंदोलनाच्या माध्यमातून शरसंधान केले आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातील वेळेतील बदल करणे, प्राध्यापकांवर लॅपटॉप चोरीचे खोटे आळ घेणे, प्राध्यापकांना प्रांतीय क्षेत्रानुसार घाटी म्हणून संबोधने, प्राध्यापकांना कमी दर्जाची वागणूक देणे, महाविद्यालयातील कोणत्याही निर्णयामध्ये प्राध्यापकांना सहभागी न करणे, स्टाफरूममधील प्राध्यापकांचा चहा, वर्तमानपत्रे बंद करणे व दरवर्षी महाविद्यालयीन इमारतीची तोडफोड करून नवीन बांधकाम करणे यावर प्राध्यापक वर्गाने आक्षेप घेत प्राचार्य सतीश धारप हटावचा नारा देवून आंदोलन केले आहे.
दुसरीकडे प्रा. धारप यांनी या सर्व मुद्यांना खोडीत, प्राध्यापकवर्ग नॅकच्या कामकाजात सहभाग न होणे, इमारत बांधकाम हा प्रमुख विषय आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही. महाविद्यालयात होणाऱ्या वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमात प्राध्यापकांचा सहभाग नसतो. विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयात भूगोल विषय सुरू करण्यास शासनाची परवानगी नाही. नॅकसंदर्भात महाविद्यालयाला कायमस्वरूपी इमारत, विद्यार्थ्यांसाठी कॉमन रुम यांची उपलब्धता असल्याशिवाय नॅकचे काम करता येणार नाही असे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Movement in Nene College