शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेरुळ, बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:33 IST

सीबीडीतील घरे, दुकानांमध्ये शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई शहरात मंगळवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून, शहरातील नेरुळ आणि बेलापूर विभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरात विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून, सीबीडी विभागातील घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रभरात शहरात सुमारे २२२.८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचा सीबीडी विभागाला मोठा फटका बसला असून, सीबीडी सेक्टर ३, सेक्टर ४, सेक्टर ६, बेलापूर गाव, कोकण भवन, सिडको भवन आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सोसायट्यांमध्येही पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पाणी शिरले. नेरुळ पोलीस ठाणे आणि जुईनगर सेक्टर २३ भागातील झाडे कोसळली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या माध्यमातून झाडे हटविण्यात आली. शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ विभागात पडला असून, २८८.५० मिमी पासवाची नोंद झाली आहे. बेलापूर २७८.४० मिमी, वाशी १८६.३० मिमी, कोपरखैरणे १८२.३० मिमी, ऐरोली १७८.८० मिमी पाऊस झाला.मीटर रूमला आग : सीबीडी सेक्टर १५ मधील सोसायटीच्या मीटर रूममध्ये शॉटसर्किटची घटना घडल्याने आग लागली होती. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.कोकण भवन कार्यालयाच्या आवारात तळेसीबीडी येथील कोकण भवनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले.होल्डिंग पाँडजवळ साचलेला गाळ आणि खारफुटीमुळे सीबीडीतील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. दरवर्षी ही समस्या उद्भवते. सीबीडी सेक्टर ४ आणि ६ भागातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने ३० ते ४० कोटींच्या मालाचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाबरोबर महापालिका जबाबदार आहे.- प्रमोद जोशी, सरचिटणीस,व्यापारी महासंघ, नवी मुंबई

टॅग्स :Rainपाऊस