मोरबेत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:32 PM2020-05-30T23:32:02+5:302020-05-30T23:33:59+5:30

नागरिकांना दिलासा : पाणीकपात टळली

Morbe dam will have enough water till September | मोरबेत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

मोरबेत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याविषयीची चिंता मिटली आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या वर्षी मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी असल्याची माहिती मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता अजय संखे यांनी ‘लोकमत’ला दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा धरण मजबूत असल्याचे व नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती.
नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो.

Web Title: Morbe dam will have enough water till September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.